CET_Exam 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी : 'सीईटी'ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, हॉलतिकीट करा डाऊनलोड!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली 'एमएचटी-सीईटी' ही परीक्षा १ ऑक्‍टोबरपासून घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्ज केलेल्या 'पीसीबी' ग्रुपच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट सीईटीच्या संकेतस्थळावरून रविवार (ता.२७) पासून डाऊनलोड करता येणार आहे.

राज्य सीईटी सेलमार्फत उच्च शिक्षणातील पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवीच्या प्रवेशासाठी यंदा सीईटीसाठी सुमारे साडे पाच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

सीईटी सेलने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषय असलेल्या 'पीसीबी' ग्रुपच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहेत. त्यावरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी आवश्‍यक असलेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या ग्रुपचे हॉलतिकीट अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.

'पीसीबी' ग्रुपच्या विद्यार्थ्यांची एमएचटी-सीईटी १ ते ९ ऑक्‍टोबर या कालावधीत होत आहे. प्रवेश अर्जाचा क्रमांक आणि पासवर्डच्या साहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करावयाचे आहे. हॉलतिकीटवर परीक्षा केंद्राचे नाव, परीक्षेची वेळ, तारीख, पत्ता आणि विद्यार्थ्यांची वैयक्‍तिक माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आणि हॉलतिकीट मिळविण्यासाठी www.mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT